अनिल म्हणाला,"बोले तो झक्कास"

 Mumbai
अनिल म्हणाला,"बोले तो झक्कास"
Mumbai  -  

अभिनेता अनिल कपूरचा मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्‍यात आला आहे. या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण अनिल कपूरच्याच हस्ते करण्यात आलं. अनिल कपूरने आपल्या ट्विटरवरून मेणाच्या पुतळ्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे. 'मी आता ही विशेष मुद्रा स्‍वीकारली आहे. हे खूपच छान आहे. मला चांगलं वाटलं. मादाम तुसाँ सिंगापूर हा एक अद्‍भूत आणि शानदार अनुभव आहे. धन्‍यवाद!' अशा आशयाचे ट्विटही अनिलने या फोटोसोबत केले आहे. 

अनिल कपूर आगामी चित्रपट 'मुबारकां'मध्‍ये एका नव्‍या लुकमध्‍ये दिसणार आहे. या नव्‍या लुकमध्‍ये अनिल कपूरने काही दिवसांपूर्वी ट्‍विटरवर फोटो शेअर केला आहे. अनिल कपूरची चित्रपटातील सरदारची भूमिका असल्‍याचे समजते. अनीस बज्मीच्‍या 'मुबारकां'मध्‍ये अनिल कपूरसोबत अर्जून कपूरदेखील असणार आहे. रियल लाइफ मध्ये अर्जुनचा काका असलेला अनिल कपूर या चित्रपटाच्या निमित्ताने रिल लाइफमध्येही अर्जुनच्या काकाची व्यक्तिरेका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
Loading Comments