Advertisement

बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर!


बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर!
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला नॉमिनेट झालेल्या सदस्यापैकी एकाला बाहेर पडावं लागतं. त्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. पण, मातृदिनानिमित्त सगळ्यांना बिग बॉसने एक सरप्राईझ दिलं. सगळ्या सदस्यांना त्यांच्या आईशी बोलण्याची संधी बिग बॉसने दिली.


सगळ्यांनाच अश्रू अनावर

याक्षणी प्रत्येक सदस्य खूपच भावूक दिसला. घरातील सदस्य बऱ्याच दिवसांपासून आपल्या नातेवाईंकापासून दूर रहात आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. शेवटी तो कठीण क्षण आला जेव्हा कोणा एकाला घरातून बाहेर जावं लागणार होतं.


अनिल थत्ते घराबाहेर

आस्ताद काळे, अनिल थत्ते आणि सुशांत शेलार हे डेंजर झोनमध्ये आले होते. आणि त्यातून सगळ्यात कमी मत अनिल थत्ते यांना मिळाली. त्यामुळे अनिल थत्ते यांना घराबाहेर जावं लागलं. अनिल थत्ते घराबाहेर पडल्याचं दु:ख सगळ्यांच झालं. सगळे खूप भावुक झाले.


पुढच्या आठवड्यात कोण सेफ?

अनिल थत्ते घरामधून बाहेर पडल्यानंतर त्यांना एक विशेष अधिकार मिळाला ज्यानुसार ते कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी वाचवू शकतात आणि अनिल थत्ते यांनी भूषण कडुला वाचवलं. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचं मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणे रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा