Advertisement

#MeToo: बदनामी सहन न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

चार मुलींनी अनिर्बानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले अाहेत. त्यामुळे त्याच्यावर सर्वच बाजूंनी टीका झाली. क्वान कंपनीने त्याच्याकडून सक्तीने राजीनामा घेतला होता. त्यामुळे त्याचा मोठा अार्थिक तोटाही झाला.

#MeToo: बदनामी सहन न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

सोशल मीडियावर चालू असलेल्या #MeToo चळवळीचे विपरीतही परिणामही दिसू लागले अाहेत. चार मुलींनी लैंगिक अत्याचाराचे अारोप केल्यामुळे बदनामी सहन न झाल्याने क्वान कंपनीचा संस्थापक अनिर्बान दास ब्लाह याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलिसाने वेळीच त्याला पकडल्याने पुढची दुर्घटना टळली. अनिर्बानला वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात अाहे. 


अनिर्बान डिप्रेशनमध्ये

चार मुलींनी अनिर्बानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले अाहेत. त्यामुळे त्याच्यावर सर्वच बाजूंनी टीका झाली.  क्वान कंपनीने त्याच्याकडून सक्तीने राजीनामा घेतला होता. त्यामुळे त्याचा मोठा अार्थिक तोटाही झाला. फेसबुकवरील बदनामी तसंच अार्थिक तोटा यामुळे अनिर्बान डिप्रेशनमध्ये गेला. या  डिप्रेशनमध्येच त्याने अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 


सजग पोलिसाने वाचवलं

शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारस वाशी पुलाच्या परिसरात अनिर्बानच्या संशयास्पद हालचाली एका पोलिसा हवालदाराला दिसल्या. पोलिसाने त्याला इथं काय करत अाहेस असं विचारल्यावर त्याने फिरायला अाल्याचे सांगितलं. त्यानंतर वाशी पुलावरून त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सजग असलेल्या पोलिसाने त्याला पकडलं. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. लैंगिक अत्याचाराचे माझ्यावर अारोप झाल्यामुळे मी प्रचंड डिप्रेशनमध्ये अाहे. त्यामुळेच मी अात्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे त्याने पोलिसांना सांगितलं. 



हेही वाचा - 
#MeToo: माझ्यावरील अारोप खोटे, नाना पाटेकरांचं सिन्टाला उत्तर



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा