Advertisement

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
SHARES

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या केली आहे. मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.नाही

नितिन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.

आता त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा