Advertisement

‘बिग बॅास’चं घर, चाहत्यांच्या दारी!

‘बिग बॅास’चं घर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे घर उमंग कुमार यांनी डिझाईन केलं आहे. बिग बाॅसचं हे घर प्रेक्षकांनाही पाहता यावं यासाठी याच घराचं प्रतिरूप बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घराचं मराठमोळं रुप प्रेक्षकांना आणि सदस्यांना खूपच आवडलं. सदस्य तर या घराच्या प्रेमातच पडले. आता हेच घर येत आहे तुमच्या शहरामध्ये थेट तुमच्या भेटीला.

‘बिग बॅास’चं घर, चाहत्यांच्या दारी!
SHARES

आज परदेशातील मराठी प्रेक्षकांनाही 'बिग बाॅस' मराठीचं जबरदस्त आकर्षण आहे. बिग बाॅसच्या आवाजापासून, घरातील सदस्यांपर्यंत... घरात होणाऱ्या लटक्या रुसव्या-फुगव्यांपासून, कडाक्याच्या भांडणांपर्यंत... आणि घरातील सदस्यांच्या लाईफस्टाइलपासून, चक्क बिग बाॅसच्या घरापर्यंत... सर्वच गोष्टींबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीचं कुतूहल आहे. या सर्वांमध्ये बिग बाॅसच्या घराबाबत जाणून घेण्याची उत्सुकता खूप आहे.

Big Boss 3.jpeg


‘बिग बाॅस’चं घर तुमच्या दारी...

आता हेच घर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे घर उमंग कुमार यांनी डिझाईन केलं आहे. बिग बाॅसचं हे घर प्रेक्षकांनाही पाहता यावं यासाठी याच घराचं प्रतिरूप बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घराचं मराठमोळं रुप प्रेक्षकांना आणि सदस्यांना खूपच आवडलं. सदस्य तर या घराच्या प्रेमातच पडले. आता हेच घर येत आहे तुमच्या शहरामध्ये थेट तुमच्या भेटीला.

Big Boss 2.jpeg

चाहत्यांसाठी सुवर्णसंधी...

कलर्स मराठी बिग बॉस मराठीचं घर पाहण्याची एक सुवर्णसंधी तमाम चाहत्यांना देत आहे. बिग बॉसचं हे घर बसच्या रुपात महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहे. ही बस अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, वाशीम, औरंगाबादच्या काही शहरांमध्ये फिरणार आहे.

Big Boss 1.jpeg

बसमध्ये घराचं प्रतिरूप...

हे सुंदर घर एका बसमध्ये तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये घरातील गार्डन एरिया, लिव्हिंग रूम आणि कन्फेशन रूम हुबेहूब तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच बिग बॉस मराठीच्या घराचं प्रतिरूप पाहण्याची उत्सुकता असेल. तेव्हा तुम्ही देखील हे घर नक्की बघा, अनुभवा. या बसमध्ये तीन रूम तयार करण्यात आल्या असून त्यामागे महत्त्वाची कारणं देखील आहेत.


विविध खोल्याचं घर...

गार्डन एरियामध्ये सदस्य बरेच टास्क खेळतात. सई, मेघा, रेशम, भूषण घरातील सदस्यांची मैत्री, त्यांचं बाँडिंग झालं. घरातील सदस्य ज्याप्रमाणे कन्फेशन रूममध्ये थेट बिग बॉस यांच्याशी संवाद साधतात त्याप्रमाणे कन्फेशन रुम तयार करण्यात आलं आहे. तसंच “बा”चा टीव्ही तयार करण्यात आला कारण, बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना महेश मांजरेकर तसेच बाहेरच्या जगाशी याच जागेहून आणि “बा”च्या टीव्हीमधून संपर्क साधता येतो. हे बिग बॉस मराठीच्या घराचं प्रतिरूप बसमध्ये तयार करण्यास जवळजवळ १५ दिवसांचा कालावधी लागला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा