दोन बायका अन् फजिती ऐका!


SHARE

मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ सध्या दोन महिलांमध्ये अडकलाय. या दोघी दुसऱ्या -तिसऱ्या कुणीच नसून त्याची प्रेयसी आणि आई आहे. टायगरची आई आयेशा आणि प्रेयसी दिशा पटाणी... सध्या या दोघीही एकमेकांकडे बघणंही टाळतात. दिशाला आपल्या करियरची काळजी आहे. तर टायगरने दिशापासून लांब राहावं अशी आई आयेशाची इच्छा आहे. नुकतेच आयेशा आणि दिशा एका कार्यक्रमात समोरासमोर आल्या. पण त्यांनी एकमेकांकडे अतिशय रागात पाहिलं. शिवाय यावेळी दोघींमध्ये शाब्दिक वादही झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या सगळ्या गोंधळात बिचाऱ्या टायगर श्रॉफचं सँडविच होताना पहायला मिळतंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या