Advertisement

भूषण कडूची ‘बिग बॅास’मधून गच्छंती


भूषण कडूची ‘बिग बॅास’मधून गच्छंती
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणं अनिवार्य होतं. यावेळी भूषण आणि शर्मिष्ठा हे डेंजर झोनमध्ये आले. त्यामुळे भूषणला घराबाहेर जावं लागलं. 

बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी भूषणला देखील मिळाली. तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? कोणतं टास्क सदस्यांना मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.


सरप्राईझेसनी भरलेला आठवडा

बिग बॉसचा हा आठवडा सरप्राईझेसनी भरलेला होता. सदस्यांना एकामागोमाग एक सरप्राईझेस मिळाली. बिग बॉसमधील 'वीकेंडचा डाव'मध्ये सदस्यांना एक नव्हे, तर दोन सरप्राईझेस मिळाली. घरामध्ये राजेश श्रृंगारपुरे, अनिल थत्ते आणि आरती सोलंकी यांना पाठवण्यात आलं. यांनी प्रत्येक सदस्यांना आपल्या मनामध्ये काय आहे? सदस्य कसे खेळत आहेत? आणि त्यांनी कसं खेळलं पाहिजे याचा सल्ला दिला.


फादर्स डेनिमित्त

फादर्स डेनिमित्त प्रत्येक सदस्याला त्यांच्या वडिलांशी बोलण्याची संधी दिली. प्रत्येक सदस्याने आपल्या मनातील भावना यानिमित्ताने व्यक्त केल्या. सगळेच खूप भावूक झाले. प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेल्या भावना यानिमित्ताने बाहेर आल्या. भूषणची गच्छंती झाल्यानंतर आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचं मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे पाहायचं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा