बिग बी @74


SHARE

मुंबई - बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी 74 वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानताना पुढेही असंच काम करत राहणार असल्याचं सांगितलं. सर्जिकल स्ट्राईकविषयी ते म्हणाले की, 'सीमेरेषेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी भारतीयांमध्ये नाराजी कायम आहे. मात्र ही वेळ वादविवाद करण्याची नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणारे जवान आणि सुरक्षादलांना भक्कम पाठिंबा देण्याची आहे.' पुन्हा राजकारणात येऊन राष्ट्रपती बनण्याबाबत विचारले असता अमिताभ यांनी ते हसण्यावारी नेले. 'पुन्हा राजकारणात येण्याचा आपला कोणताही इरादा नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी नेहमीच असे विनोद करत असतात,' असे ते म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या