बिग बाॅस ११: विकास गुप्ता, पुनीश शर्मा बिग बाॅस फिनालेतून 'एलिमिनेट'


SHARE

बिग बाॅस सिझन ११ च्या फिनालेतून विकास गुप्ता आणि पुनीश शर्मा एलिमिनेट झाल्याचं वृत्त एका न्यूज नेटवर्कने दिलं आहे. पुनीशने काल रात्रीच कॅश प्राईझ घेऊन घर सोडण्याला पसंती दिल्याने तो या फिनालेतून बाहेर पडला, तर त्याच्या पाठोपाठ विकास गुप्ताही एलिमिनेट झाला. त्यामुळे आता शिल्पा शिंदे किंवा हिना खान या दोघीपैंकी एक बिग बाॅस सिझन ११ ची विजेती ठरण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत जगभरातील बिग बाॅसचे फॅन्स बिग बाॅस ११ सिझनचा विनर कोण होणार याची आतुरतेने वाट बघत आहेत. हा फिनाले आॅन एअर जाण्याअगोदरच बिग बाॅसच्या घरातून काही आश्चर्यकारक गोष्टी बाहेर आल्या आहेत.
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आणि @the_khabari च्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार बिग बाॅस फिनालेच्या रेसमधून पुनीश शर्मा आणि विकास गुप्ता एलिमिनेट आहेत. त्यापैकी काल रात्री पुनीश शर्मा आणि आज विकास गुप्ताने या घराबाहेर पाऊल ठेवलं आहे.

या वृत्तामुळे पुनीशचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. कारण 'लाॅस्ट बाॅय' अशी बिग बाॅसच्या घरात इमेज तयार झालेल्या पुनीशने चाहत्यांची मने जिंकली होती. त्यामुळे बिग बाॅस फिनालेच्या रेसमध्ये तो विनर होईल, अशी दाट शक्यता होती. पण त्याने कॅश प्राईझ घेऊन घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

तर अनेक टिव्ही सेलिब्रिटींनी बिग बाॅसच्या घरातला मास्टर माईंड विकास गुप्ता जिंकावं असं मत व्यक्त केलं होतं. पण त्याच्या बाहेर पडण्यामुळे आता बिग बाॅस सिझन ११ फिनालेच्या रेसमध्ये केवळ शिल्पा आणि हिना या दोघीजणीच उरल्या आहेत. त्यामुळे या दोघींपैकीच एकजण विनर होणार हे नक्की. फिनालेमध्ये अभिनेता अक्षय कुमार पॅडमॅन या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. त्याच्या जोडीला अर्थात बिग बाॅसचा होस्ट अभिनेता सलमान खानही असणार आहे. अक्षय फिनालेच्या विनरचं नाव घोषित करेल. 


संबंधित विषय