Advertisement

सई मागणार रेशमची माफी!


सई मागणार रेशमची माफी!
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या वीकेंडचा डाव या भागामध्ये सोमवारी कुणाचंही एलिमनेशन होणार नाही, सगळे सुरक्षित आहेत, असं महेश मांजरेकर यांनी सदस्यांना सांगितलं. त्यामुळे घरच्यांना खूप आनंद झाला. रविवारच्या भागामध्ये सई आणि मेघावर रेशम बरीच नाराज असल्याचं दिसून आलं.


सोमवारच्या भागात काय?

'कानगोष्टी'च्या खेळामध्ये रेशमनं तिचं मत व्यक्तदेखील केलं. सईकडून झालेल्या चुकीवरून मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ यांनी बोलूनही दाखवलं की, ज्याप्रकारे रेशमला ती बोलली ते अयोग्य होतं आणि यापुढं असं बोलू नकोस. सोमवारी सई रेशमची वेगळ्याप्रकारे माफी मागणार आहे. तेव्हा रेशम सईला माफ करणार का? बिग बॉस घरातील सदस्यांना सोमवारी कोणता टास्क देणार? कोण घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार? या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? हे बघणे रंजक असणार आहे.


बिग बॉसच्या घरामध्ये सोमवारी नॉमिनेशन प्रक्रियेचं कार्य रंगणार आहे. बिग बॉस या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना देणार आहेत. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडेल. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात येणार आहेत.


नॉमिनेशनमधून सुरक्षित होण्यासाठी?

प्रत्येक जोडीला एक कंटेनर देण्यात येणार आहे, त्या कंटेनरमध्ये वाळू भरलेली असेल. नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना इतर जोड्यांच्या कंटेनरमधील वाळू कमी करायची आहे, तसंच आपल्या कंटेनरमधील वाळू कमी होणार नाही, याचीही दक्षता घ्यायची आहे. सोमवारच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोणत्या जोड्या नॉमिनेट होणार आणि कोणत्या विजयी होतील हे देखील पाहायला मिळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा