कोण बनणार ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन?

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये बुधवारी ‘होऊ दे चर्चा’ हे साप्ताहिक कार्य पार पडलं. फोटो लपवण्यावरून सई आणि शर्मिष्ठाचं झालेलं भांडण चांगलंच रंगलं.

  • कोण बनणार ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन?
  • कोण बनणार ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन?
SHARE

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये बुधवारी ‘होऊ दे चर्चा’ हे साप्ताहिक कार्य पार पडलं. फोटो लपवण्यावरून सई आणि शर्मिष्ठाचं झालेलं भांडण चांगलंच रंगलं. नळाच्या टास्कदरम्यान भूषण कडूला टेंगुळ आलं होतं ही गोष्ट आस्तादने एका वेगळ्या प्रकारे ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेक्षकांसमोर सादर केली. तर सईने डोळ्यांवर पट्टी बांधून ऑमलेट बनवलं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज बिग बॉसमधील सदस्य ‘बिग बॉस न्यूज’मध्ये सादर करत आहेत. आज गुरुवारी देखील हे साप्ताहिक कार्य सुरू राहील.

घरातील सर्व सदस्य हा सगळा खटाटोप कॅप्टनसीची उमेदवारी मिळवण्यासाठी करत आहेत. साप्ताहिक कार्यामध्ये आजही बऱ्याच ब्रेकिंग न्यूज बघायला मिळणार आहेत. तसंच आस्तादने कुठल्या गोष्टीचा? आणि का निषेध केलं? हे आज पाहायला मिळेल.

‘होऊ दे चर्चा’ या टास्कमध्ये आऊ अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज देणार आहेत. तसंच पुष्कर त्याच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची खास मेजवानी देणार आहे. तो एक छान नृत्य सादर करणार आहे. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक होणार आहे. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नसावा हे त्यामागचं कारण असू शकतं. कारण आस्तादचं म्हणणं आहे की, “सकारात्मक गोष्ट सोडून जर मनातील भडास निघण्यासारखी एक गोष्ट अधोरेखित करून दाखवायची असेल, तर या विचारसरणीला माझा विरोध आहे... म्हणून मी निषेध करतो”.

वटपौर्णिमा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं व्रत मानलं जातं. यानिमित्ताने घरातील सदस्यांना रुचकर पदार्थ बनवण्याची संधी बिग बॉस देणार आहेत. बिग बॉसतर्फे चविष्ठ पदार्थांचा आनंद लुटण्यासाठी ‘आरोग्यमय आहार’ हे कार्य देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आऊ आणि शर्मिष्ठा मिळून पुऱ्या आणि बटाट्याची भाजी बनवणार आहेत. या जोडीला घरातील इतर सदस्य अजून कोणते पदार्थ बनवतील हे देखील आजच्या भागात पाहायला मिळेल.


नवा कॅप्टन कोण?

‘होऊ दे चर्चा’ या साप्ताहिक कार्यामध्ये जो सदस्य जास्तीत जास्तीत ब्रेकिंग न्यूज देणार त्याला या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे घराचा नवा कॅप्टन बनण्याची सुवर्णसंधी कोणाला मिळते हे पाहाणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या