Advertisement

जॉन अब्राहमने रिक्षातून केला प्रवास


जॉन अब्राहमने रिक्षातून केला प्रवास
SHARES

मॉडलिंगपासून अपल्या करियरची सुरुवात करणारा बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला आता कोणत्याही प्रसिद्धी किंवा ओळखीची गरज नाही. महागड्या बाइक्सने फिरण्याची प्रचंड हौस असलेल्या जॉन अब्राहमने चक्क रिक्षातून प्रवास केला. हे वाचून तुम्हालाही विश्वास बसला नसेल ना?.



जॉन अब्राहमने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत रिक्षातून केलेल्या प्रवासाचा आपला अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे. एवढेच नाही तर तो रिक्षाचालक आपला मित्र असल्याचेही त्याने म्हटले आहे. जॉन अब्राहमने धुम या सिनेमात केलेल्या बाईक स्टंटनंतर तरुणांमध्ये बाईकची क्रेझ वाढली.

सध्या जॉन त्याचा आगामी चित्रपट परमाणू, द स्टोरी ऑफ फोखरण यांच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. परमाणू हा सिनेमा डिसेंबरपर्यंत रिलीज होण्याची शक्यता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा