शाहरुख, अनुष्का उडाले 'फुर्रss'!

  Mumbai
  शाहरुख, अनुष्का उडाले 'फुर्रss'!
  मुंबई  -  

  बॉलिवूडचा किंग खान आणि अनुष्का शर्मा यांचा आगामी चित्रपट 'जब हॅरी मेट सेजल' यातील गाण्याचा टीझर शाहरूखने ट्वीटरवर शेअर केला आहे. 'फुर्रss' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या टीझरमध्ये बॅकग्राऊंड म्युझिकसोबतच अनुष्काचे काही संवादही आहेत. हे गाणे अमेरिकेतील ग्रॅमी विजेता डीजे डिप्लो आणि प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले आहे  या गाण्यामध्ये "सेजल ये फुर्रss फुर्रss क्या लगा रखा है?" असा प्रश्न शाहरुखने अनुष्काला म्हणजेच सेजलला विचारला आहे. यावर उत्तर देत अनुष्का म्हणाली की, "हॅरी ये तो बस ट्रेलर है... कल डिप्लो और प्रीतम को पुछके दिल्ली में पुरा बताऊंगी."


  दिल्लीच्या फेमस क्लबमध्ये हे गाणे प्रदर्शित केले जाणार आहे. या गाण्याचं शूटिंग लॉस एंजेलिसमधल्या सनी व्हिस्टात झालं आहे.

  सध्या 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये शाहरूख आणि अनुष्का व्यस्त आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने पण थोडे हटके असं या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आलंय. चित्रपटाचा ट्रेलरच नाही, तर अनेक शहरांमध्ये जाऊन चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातूनही प्रमोशन केले जात आहे. अहमदाबादमध्ये सेजल नावाच्या मुलींसोबत 'राधा' हे गाणं लाँच करण्यात आलं. मुंबईतल्या क्लबमध्ये 'बीच बीच में' हे गाणे लाँच करण्यात आले. पंजाबमध्ये 'बटरफ्लाय' हे गाणे लाँच करण्यात आले. निर्माता आणि दिग्दर्शकांनी अनेक देशांमध्ये चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केलं आहे.

  इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरूख, अनुष्काच्या मुख्य भूमिका असणारा 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपट ४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॅरी आणि सेजलची केमिस्ट्री गाजणार का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.