बॉलिवुडचे नखरेबाज सेलिब्रिटि!

Mumbai
बॉलिवुडचे नखरेबाज सेलिब्रिटि!
बॉलिवुडचे नखरेबाज सेलिब्रिटि!
बॉलिवुडचे नखरेबाज सेलिब्रिटि!
बॉलिवुडचे नखरेबाज सेलिब्रिटि!
बॉलिवुडचे नखरेबाज सेलिब्रिटि!
See all
मुंबई  -  

बी टाऊनच्या सेलेब्रिटींची प्रत्येक गोष्ट निराळी आणि हटके असते. त्यांचे राहणीमान, त्यांचे खाणे पिणे आणि त्यांच्या सवई थोड्या विचित्रच असतात. मात्र हेच नखरे सेलेब्रिटींचे स्टाईल स्टेटमेंट ठरतात. सेलेब्रिटींचे हेच अजब-गजब नखरे झेलता-झेलता मात्र निर्माता आणि दिग्दर्शकांच्या नाकी नऊ येतात.

चित्रपट साईन करताना सेलेब्रिटी आपल्या मागण्या काँट्रॅक्टमध्ये नमूद करतात. जर त्यांच्या मागण्या पूर्ण होत असतील तरच ते चित्रपट साईन करतात. अक्षय कुमार, हृतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा अशा अनेक स्टार्सच्या चित्रपटाच्या सेटवरील मागण्या ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल.

हृतिक आऊटडोर शूटिंगला शेफला घेऊन जातो

आता सेलेब्रिटींच्या डिमांडबद्दल बोलायचे झाले तर यात पहिल्या क्रमांकावर येतो तो हृतिक रोशन. हृतिक रोशनला सर्वाट फिटेस्ट स्टार म्हणून ओळखले जाते. हृतिकही त्याच्या आरोग्याची खूप काळजी घेतो. जागा बदलली तरी तो त्याचे डाएट फॉलो करतो. पण हृतिक जेव्हा आऊटडोअर शूटिंगसाठी जातो तेव्हा तो आपल्यासोबत एक स्पेशल शेफ घेऊन जातो. तसेच आऊटडोअर शूटिंग जिथे होत असेल तिथल्याच जिममध्ये जाणे तो पसंत करतो. या सर्वाचा खर्च प्रोडक्शन टीमला करावा लागतो. जर खर्च अवाक्याबाहेर जात असेल तर हृतिक स्वत: खर्च उचलतो. त्याची दुसरी डिमांड तर तुम्हाला अचंबित करेल. हृतिक एखाद्या मुलाखत किंवा फोटोशूटपूर्वी मोठ्या आरशात पाहणे पसंत करतो. हृतिकचा स्पॉट बॉय एक मोठा आरसा ठेवतो. मुंबई असो किंवा मुंबईच्या बाहेर असो, त्याच्या स्पॉट बॉयकडे एखाद्या ड्रेसिंग टेबलच्या आरशापेक्षा मोठा आरसा असतो.

नो वर्क ऑन संडे 

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हासुद्धा बी टाऊनमधील फिटेस्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचे फिट राहण्याचे गुपित म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम. तो त्याच्या स्ट्रिक्ट लाईफस्टाईलमुळे खूप चर्चेत आहे. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करणे. अक्षय कुमार जेव्हा चित्रपट साईन करतो तेव्हा त्याच्या काँट्रॅक्टमध्ये दोन गोष्टी असतात. एक तर रात्री दहा वाजल्यानंतर काम नाही करणार. तर दुसरा संडेला तो शूटिंग नाही करणार. संडे हा त्याच्यासाठी फंन डे असतो. संडेला तो फक्त आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवतो.

किसिंग सीन्स ना... ना... रे बाबा

हल्ली चित्रपटात बोल्ड सीन द्यायला अभिनेत्री सहज तयार होतात. पण दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा मात्र अशा दृष्यांच्या विरोधात आहे. चित्रपटात हिरोला किस करणार नाही आणि कोणतेच इंटिमेट सीन करणार नाही, असे तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेले असते. मग तो चित्रपट तिच्या करीअरसाठी किती महत्त्वाचा का असेना. पण ती असे सीन करण्याच्या विरोधात आहे. तिच्या मते असे सीन्स केल्याने कुटुंबियांना जाब द्यायला लागतो.

ओन्ली वर्क्स विथ ए लिस्टेड अॅक्टर्स

करीना कपूर ही कपूर फॅमिलीमधून आलेली आहे. पण असे असले तरी बी टाऊनमध्ये तिने तिचे एक स्टेटस मेंटेन ठेवले आहे. कपूर खानदानची असली तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बी टाऊनमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. पण करीना कपूरची एक डिमांड ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. करीना बी ग्रेड चित्रपटात काम केलेल्या कलाकारांसोबत काम करणे पसंत करत नाही. फक्त फेमस अभिनेत्यांसोबत तिला काम करायला आवडते. तिच्या या डिमांडमुळे कितीतरी चित्रपट तिने गमावले आहेत.

आय एम नॉट हिअर टु एन्टरटेन यू

बॉलिवूडची क्वीन कंगना रणावतला दुसऱ्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडत नाहीत. दुसऱ्याला जास्त एन्टरटेन करायला तिला आवडत नाही. यासाठी ती तिच्या पर्सनल असिस्टंटला घेऊन फिरते. प्रत्येक जागी तिला तिची पर्सनल असिस्टंट हवी असते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.