Advertisement

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह ट्विट: अभिनेत्री पायल रोहतगीने मागितली माफी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ट्विटरवरून आक्षेपार्ह विधान करणारी अभिनेत्री पायल रोहतगीला उपरती झाली असून तिने आपल्या विधानाबद्दल जाहीर माफी मागितली आहे. माफी मागतानाच माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचंही तिने म्हटलं आहे.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह ट्विट: अभिनेत्री पायल रोहतगीने मागितली माफी
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ट्विटरवरून आक्षेपार्ह विधान करणारी अभिनेत्री पायल रोहतगीला उपरती झाली असून तिने आपल्या विधानाबद्दल जाहीर माफी मागितली आहे. माफी मागतानाच माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचंही तिने म्हटलं आहे.

काय म्हणाली होती पायल? 

'शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म एका शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता' असं ट्विट पायलने केलं होतं. त्यानंतर नेटीझन्सनी तिच्यावर सडकून टीका केली. या टीकेनंतर उपरती झालेल्या पायलने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ पोस्ट

या व्हिडिओमध्ये ती आपली बाजू मांडताना दिसत आहे. या व्हिडिओत ती म्हणते की, 'मी विचारलेला साधा-सरळ प्रश्न कुणालाच समजला नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा उद्देश शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचा होता. पण काही जणांना वाटलं की मी महाराजांबद्दल चुकीचं बोलले. त्यामुळे मी त्या सगळ्यांची माफी मागते.

तुमच्या महाराजांबद्दल वाचलेल्या गोष्टींची मला खात्री करून घ्यायची होती. पण, माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी मला लक्ष्य करण्यात आलं. मला कुणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात नाही हे मला आज समजलं.'  

याप्रकारे तिने आपली बाजू मांडत चुकीच्या विधानाबद्दल माफीही मागितली.

हेही वाचा-

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अभिनेत्री पायल रहतोगी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा