Advertisement

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर झुंज

मोहक अदा अन् सशक्त अभियनाच्या जोरावर बाॅलिवूडचा रुपेरी पडदा गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली बेंद्रे-बहलला कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं असून ती सध्या अमेरिकेतील रुग्णालयात कॅन्सरशी झुंज देत आहे.

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर झुंज
SHARES

मोहक अदा अन् सशक्त अभियनाच्या जोरावर बाॅलिवूडचा रुपेरी पडदा गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली बेंद्रे-बहलला कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं असून ती सध्या अमेरिकेतील रुग्णालयात कॅन्सरशी झुंज देत आहे. 'मुंबई लाइव्ह'ने याआधीचं सोनालीने झी टीव्हीवरील ड्रामेबाज शोमधून वैयक्तीक कारणास्तव माघार घेतल्याची बातमी दिली होती. या 'रियालिटीचा शो' पहिला एपिसोड होतो न होतोच ही धक्कादायक बातमी तिच्या चाहत्यांवर येऊन आदळली आहे. सोनालीने आपल्या चाहत्यांना ट्विटरवर भावनीक पत्र लिहून आजारासंबंधीची माहिती दिली आहे.


 


काय म्हणाली सोनाली?

ट्विटरवर आपल्या चाहत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सोनाली म्हणते की, जेव्हा तुम्ही आयुष्याकडून कमीत कमी अपेक्षा ठेवता, तेव्हा तुमच्या पुढ्यात अनपेक्षीत गोष्ट येऊन उभी ठाकते. मी सध्या अशा कॅन्सरसोबत झुंज देत आहे, ज्यातून क्वचितच कुणी बाहेर येऊ शकलं आहे.

एक लहानसं दुखणं काही चाचण्यांकडे घेऊन गेलं आणि या चाचण्यांमधून अनपेक्षीत गोष्ट समोर आली. सध्या माझे कुटुंब आणि मित्रमंडळी माझ्या अवतीभोवती राहून माझं बळ वाढवत आहेत. माझ्यासाठी सर्वोत्तम उपचारांसाठी सोय करत आहेत. मी अमेरिकेतील न्यूयाॅर्क इथं उपचार घेत असून प्रत्येक पावलावर या आजाराशी झुंज देत आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.हेही वाचा-

उपचारासाठी लंडनला गेलेल्या इरफानने फोटोसह पोस्ट केली इमोशनल कवितासंबंधित विषय
Advertisement