Advertisement

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती

हायकोर्टानं तुर्तास मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबई इथल्या कार्यालयाचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली होती. याविरोधात कंगना रणौतनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टानं तुर्तास मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं मुंबई पालिकेला दिले आहे. महापालिकेनं उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानं ही स्थगिती देण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी ३ वाजता सुनावणी होणार आहे.

सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती. दरम्यान कंगनाच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली. रिट याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टच्या पूर्ण खंडपीठाच्या आदेशानुसार कोविड-१९ मुळे कोणतेही न्यायालय / ट्रिब्यूनल / प्राधिकरणाची तोडफोड करण्याचे आदेश ३० सप्टेंबरपर्यंत अमान्य आहे, असं म्हटलं आहे.

कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी पालिकेनं बजावलेली नोटीस बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. याविषयी आम्ही कोर्टात आवाज उठवणार आहोत. कंगनाच्या अनुपस्थितीमध्ये पालिकेचे कर्मचारी तिच्या कार्यालयात घुसले. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यामुळे पालिकेच्या विरोधामध्ये ट्रेसपोसिंग आणि जबाबी कारवाईची नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे.

कंगनानं दिलेली उत्तरं आणि कारणं समाधानकारक नाहीत, असं सांगत मुंबई महापालिकेनं तिच्या वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेलं कार्यालय पाडणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली.

कारवाईनंतर कंगनानं ट्विट करत म्हटलं की, माझ्या घरात कोणतेही अनधिकृत बांधकाम नाही. तसंच शासनाकडून कोविडमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडफोडवर बंदी घालण्यात आली आहे. बुलिवूड पाहा आता फॅसिज्म काय असते ते. असं म्हणत तिनं लोकशाहीची हत्या असा हॅशटॅग दिला आहे.



हेही वाचा

पालिकेच्या कारवाईनंतर कंगना पुन्हा बरळली, मुंबईला म्हणाली पाकिस्तान

"हो मी ड्रग्ज घ्यायचे", कंगनाचा 'हा' व्हिडिओ व्हायरल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा