Advertisement

'दशक्रिया'च्या प्रदर्शनाविरोधातील याचिका फेटाळली


'दशक्रिया'च्या प्रदर्शनाविरोधातील याचिका फेटाळली
SHARES

दशक्रिया विधींच्या जुन्या परंपरेवर भाष्य करणारा सिनेमा 'दशक्रिया' च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत ब्राम्हण महासंघाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असून सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधातील याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सिनेमा शुक्रवारी 17 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असतानाच ही याचिका दाखल करण्यात आली होती. 

या सिनेमाच्या प्रदर्शनाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा देत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हटले आहे. प्रदर्शनाला विरोध असला तरीही औरंगाबादमधील चार चित्रपटगृहांत हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला.


काय म्हटलेय या याचिकेत?

चित्रपटात अनेक संवाद हे भावना दुखावणारे असल्याने याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती.


'आधीच आक्षेप का घेतला नाही?'

दशक्रिया दोन चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित झाला होता. 'दशक्रिया' चित्रपटाला ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट (निर्मिती - दिग्दर्शन), सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अशा चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राज्य शासनाकडून या सिनेमाला 11 पुरस्कार देखील मिळाले आहेत. चार भाषांत याचे अनुवादही झाले आहे. त्यावेळी कोणीच आक्षेप का घेतला नाही. आता विरोध का केला जात आहे, असे प्रश्न दशक्रिया कादंबरीचे लेखक बाबा भांड यांनी उपस्थित केले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा