अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलेनाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आता या रहस्यावरून पडदा उठला असून, writer and playwright premanand gajvi elected as president of 99th all india marathi natya sammelanप्रेमानंद गज्वी यांच्या नावाची ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाट्यसंमेलन मोठ्या थाटात होणार असलं तरी अद्याप संमेलनाच्या ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली नाही. तत्पूर्वी गज्वी यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गज्वींसमवेत अध्यक्षपदाच्या शर्यतीत श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर या नाट्यकर्मींच्या नावांचा समावेश होता. मात्र या सर्वांना मात देत गज्वी यांनी अध्यक्षपदाचा मुकूट धारण करण्याचा मान पटकावला आहे. ९८ अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडून गज्वी अध्यक्षपदाचा भार स्वीकारणार आहेत.
नाट्य संमेलनाच्या ठिकाणांच्या स्पर्धेत लातूर, नागपूर, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांची नावं असल्याचं समजतं. यापैकी कोणत्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात येतं ते लवकरच समजेल. वरील सर्व ठिकाणांचा दौरा करून नाट्यसंमेलन समिती संमेलनाचं अंतिम ठिकाण लवकरच ठरवेल असं बोललं जात आहे.
हेही वाचा -
वर्षा-किशोरीच्या जुगलबंदीचा 'पियानो'!
डेट विथ सई'मध्ये सईची मिरर इमेज!