'दी कपिल शर्मा शो' मध्ये 'गुत्थी'चं प्रमोशन रद्द

  Pali Hill
  'दी कपिल शर्मा शो' मध्ये 'गुत्थी'चं प्रमोशन रद्द
  मुंबई  -  

  मुंबई - 'दी कपिल शर्मा शो' मधला गुत्थी अर्थात सुनील ग्रोवरचं बॉलीवूडमध्ये येणं कदाचित कपिल शर्माला पसंत नाही. कारण 'कॉफी विथ डी गँग' या आगामी सिनेमात सुनील महत्त्वाच्या भूमिकेत असून या सिनेमाचं प्रमोशन तो 'दी कपिल शर्मा शो'मध्ये करू इच्छितो. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या प्रमोशनला कपिलने नकार दिला आहे.

  सध्या ‘दी कपिल शर्मा’च्या शोमध्ये सुनीलने साकारलेल्या डॉ. गुलाटीच्या या नव्या भूमिकेला दर्शकांकडून खूपच पसंती दिली जात आहे. 'कॉफी विद डी गँग' चे दिग्दर्शक विशाल मिश्रा यांनी सांगितलं की, सुनील याचा पंजाबी सिनेमा 'वैसाखी' च्या प्रमोशनला मागच्या वर्षी याच शोमध्ये पाच मिनिटाचा वेळ दिला होता. मात्र या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने 30 मिनिटांचा वेळ मागितला आहे. पण कपिलचं म्हणणं आहे की फक्त 5 मिनिटच दिला जाईल. 'या पूर्वी कलर्स वाहिनीवरील कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमधून कपिलने निरोप घेतला होता. त्यावेळी सुनील आणि कपिल यांच्यात वाद झाले होते. मात्र सर्व जुने वाद विसरत सुनीलने पुन्हा या नवीन शोमध्ये पुनर्आगमन केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.