Advertisement

बिग बॉसच्या घरात कॅप्टनशीपची चर्चा


बिग बॉसच्या घरात कॅप्टनशीपची चर्चा
SHARES

मराठी बिग बॉसमध्ये आता स्पर्धकांचे रंग दिसायला सुरू झाले आहेत. गुरुवारी बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे सगळ्यांचीच चिडचिड झालेली दिसली. आता हे स्पर्धक नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. मेघा आणि आरती या दोघीही आपली नाराजगी अनिल थत्ते यांच्याकडे स्पष्टपणे व्यक्त केली आहे.

यादरम्यान जुई गडकरीने विनीत भोंडेला तिला न पटणाऱ्या गोष्टी विचारून त्याला जाब विचारताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक एकमेकांना ओळखत नसल्याने त्यांच्यात खटके उडणे, मतभेद होणे नक्कीच स्वाभाविक आहे. पण आता या घरामध्ये ग्रुप बनण्यास सुरुवात झाली आहे, हे मात्र नक्की.


आनिल, विनीत बनले चर्चेचा विषय

अनिल थत्ते आणि विनीत भोंडे हे दोघेही बिग बॉस घरामध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. घरातील बऱ्याचशा सदस्यांना त्यांचं वागणं पटत नसल्याचं प्रेक्षकांना दिसून येत आहे. एकीकडे उषाताई विनीतला वारंवार सांगत असतात की त्याने आपल्या बोलण्यावर आणि आवाजावर सयंम ठेवण्याची गरज आहे, तर दुसरीकडे अनिल थत्ते यांना सतत प्रकाश झोतामध्ये रहायला आवडतं याबद्दलची चर्चा मुलींच्या रूमध्ये रंगत असलेली प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

हे घडत असताना विनीत भोंडेला बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलवण्यात येणार आहे. ज्यामध्ये बिग बॉस त्याला एक सिक्रेट टास्क देणार आहे. आता हा टास्क काय आहे? कशाच्या संदर्भात आहे? विनीत हा टास्क पूर्ण करू शकेल का? हे बघणं रंजक असणार आहे.


या तिघांमध्ये शिजतंय तरी काय?

आस्ताद, रेशम, राजेश, सुशांत या तिघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचं दिसणार आहे. ते नक्की काय प्रेक्षकांना भाग बघितल्यावरच कळेल. दरम्यान बिग बॉसने घरामधील कॅप्टनशिपचे महत्त्व घरच्यांना समजावले आणि आता घराचा दुसरा कॅप्टन निवडण्याची घोषणा केली. आणि नंतर स्पर्धकांमध्ये याबद्दलची चर्चा रंगली.

आता या नव्या कॅप्टनशिपच्या प्रचार टास्कमध्ये कोण जिंकणार? घरचा दुसरा कॅप्टन कोण बनेल? त्यासाठी शुक्रवारी बिग बॉसचा भाग चुकवून चालणार नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा