• दीपिकाला धमकावणाऱ्याला ऋषी कपूरनी खडसावलं
SHARE

मुंबई - राजस्थानमध्ये पद्मावती या सिनेमाच्या एका दृश्याच्या चित्रिकरणावरून घेतलेला आक्षेप आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी निषेध केला आहे. असं बोललं जात आहे की, करणी सेनेच्या हल्ल्यानंतर भन्साळी फिल्मची स्टार कास्ट मुंबईत परतली आहे. या सिनेमात राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोणने या हल्ल्याविषयी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. या हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला असून आपण यातून अजून सावरलं नसल्याचं तिने सांगितलं. ती पुढे म्हणाली याबद्दल खूप दु:ख झालं आहे. पण दीपिकाचं अशा प्रकारे दु:ख व्यक्त करणं एका ट्रोलला पटलेलं नाही. यावर निशांत जैन नावाच्या एका व्यक्तीने दीपिका, प्रियंका चोप्रा आणि ऋषी कपूरला टॅग करत म्हणाला बॉलिवूड तर फक्त एक सुरुवात आहे, जर तुम्ही तुमचे रस्ते बदलले नाहीत तर पुढे तुम्हाला आणखी बरच काही पाहायला मिळेल. यानंतर बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेता ऋषि कपूर यांनी या ट्रोलला चांगलंच खडसावत महिलांबद्दल काही म्हणण्यापूर्वी विचार करावा असे म्हटले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या