Advertisement

'ब्रेव्हहार्ट'मध्ये झळकणार गायकवाडांची सून


'ब्रेव्हहार्ट'मध्ये झळकणार गायकवाडांची सून
SHARES

मुंबई - 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या खूप गाजतेय. त्यातले मुख्य भूमिका साकारणारे राणा आणि पाठक बाई तर सगळ्यांचे फेवरेट झालेत. याच मालिकेतील गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनी म्हणजे खऱ्या आयुष्यातील धनश्री काडगांवकर. हीच नंदिता वहिनी लवकरच ‘निखिल फिल्म्स’ प्रस्तुत 'ब्रेव्हहार्ट..जिद्द जगण्याची' या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. निर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस आणि संतोष यशवंत मोकाशी निर्मित ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शन दासबाबू यांनी केलंय.

धनश्री काडगांवकर ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात अभिनेता संग्राम समेळ याच्यासोबत झळकणार आहे. धनश्री, संग्रामसोबत अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, अथर्व तळवलकर, स्वामीकुमार बाणावलीकर, प्रदीप भिडे आदी कलाकार यात एकत्र आले आहेत. सत्यघटनेवर आधारित ‘ब्रेव्हहार्ट’ची पटकथा-संवाद आणि गीते श्रीकांत बोजेवार यांनी लिहिली असून अर्नब चटर्जी यांनी संगीत तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिलं आहे.

‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटातील धनश्रीच्या भूमिकेची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. त्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण ‘ब्रेव्हहार्ट’ येत्या एप्रिलमध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा