Advertisement

...असा झाला पारूलवर हल्ला


SHARES

अंधेरी - दाक्षिणात्य अभिनेत्री पारुल यादववर काही दिवसांपूर्वी काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंधेरीतल्या एका अपार्टमेंटमध्ये राहणारी पारुल तिच्या प्लुटो नावाच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. तेवढ्यात तिच्यावर काही भटके कुत्रे झेपावले. आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पारुलने प्लुटोला उचलून घेतलं. पण, चार - पाच कुत्र्यांनी पारुलवर असा काही हल्ला केला की तिला डोक्यावर आणि हातावर जखमा झाल्या. लगेचच आसपासच्या स्थानिकांनी पारुल आणि प्लूटोला या कुत्र्यांच्या तावडीतून सोडवलं. पण, हल्ल्यात पारुलच्या हातासह डोक्याला जखम झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा