'दुहेरी'तील संकेत दिसणार रुपेरी पडद्यावर

Pali Hill
'दुहेरी'तील संकेत दिसणार रुपेरी पडद्यावर
'दुहेरी'तील संकेत दिसणार रुपेरी पडद्यावर
See all
मुंबई  -  

मुंबई - छोटा पडदा ते मोठा पडदा हा प्रवास मराठी कलावंत नेहमीच करताना दिसतात. परंतु, आताच्या काळात छोट्या पडद्यावर दैनंदिन मालिकेसाठी दररोज कितीतरी काम करणं आणि त्याचवेळी रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या चित्रपटात काम करणे ही तशी अवघड बाब ठरते. पण, स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहेरी या मालिकेतील प्रमुख कलावंत असलेला अभिनेता संकेत पाठकनं शक्य करून दाखवलंय. सध्या त्याची दुहेरी ही मालिका छोट्या पडद्यावर दणक्यात सुरू असून मालिका संपण्याच्या अगोदरच मालिकेसाठी दररोज चित्रीकरण करतानाच त्यानं ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटाचं चित्रीकरणही यशस्वीरित्या पूर्ण केलंय.

संतोष पानकर निर्मित आणि विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी हा मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विनोद, नाट्य, प्रेम,हाणामारी, भावनिकता अशा विविध गोष्टींचं दर्शन घडवणारा हा चित्रपट संपूर्ण कुटुंबानं एकत्र चित्रपटगृहात जाऊन पाहावा असा आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.