मुंबई - बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान लग्नाचा 25वा वाढदिवस स्पेनमध्ये साजरा करतोय. रील लाईफमध्ये रोमॅँन्टिक असणारा शाहरुख रियल लाईफमध्येही तितकाच रोमॅन्टिक आहे. गौरीलाही या रोमॅन्टिक बॉयला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले होते. सध्या गौरी आणि शाहरुख आपला हा खास दिवस स्पेनमध्ये सेलिब्रेट करतायत आणि त्यातच आलेल्या दिवाळीने त्यांचा आनंदही द्विगुणित केलाय.