‘तम्मा तम्मा’ गाण्यावर माधुरीचे पुन्हा ठुमके

  Mumbai
  ‘तम्मा तम्मा’ गाण्यावर माधुरीचे पुन्हा ठुमके
  मुंबई  -  

  मुंबई – वरुण धवन आणि आलिया भट यांच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. या चित्रपटासाठी ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे एका नव्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

  तनिष्क बागचीने हे गाणे तयार केले असून रॅपर बादशाहाच्या रॅपचा सुरेख तडकाही या गाण्याला देण्यात आला आहे. आलिया आणि वरुणच्या नृत्य शैलीमध्ये मात्र काही धम्माल स्टेप्स पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या काही स्टेप्ट माधुरी दीक्षितने शिकवल्या आहेत. याचा व्हिडिओही करण जोहर आणि वरूण धवनने ट्विटरवर शेअर केला आहे.

  सरोज खान नाराज

  तम्मा तम्मा गाणे वेगवेगळ्या कारणांनी गाजत असतानाच आता या गाण्यामुळे प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान मात्र नाराज झाली आहे. वरुण आणि आलियाला या गाण्याच्या स्टेप्स शिकवण्यासाठी दिग्दर्शकाने सरोज खान यांना न बोलावता माधुरी दीक्षितला बोलावल्यामुळे त्या नाराज झाल्या आहेत.

  "मला हे गाणे आताही कोरियोग्राफ करायला आवडले असते. त्यांना मी म्हातारी झालेय असे वाटतेय. पण माधुरी अजून म्हातारी झालेली नाही. त्यामुळे त्यांनी तिला बोलावले असेल," असा टोमणा मारत सरोज खान यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

  ‘ठाणेदार’ या 1990 च्या चित्रपटात ‘तम्मा तम्मा’ हे गाजलेले गाणे संजय दत्त आणि माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आले होते. त्यावेळी हे गाणे सरोज खान यांनी कोरियोग्राफ केले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.