Advertisement

बूट पॉलिश करणाऱ्या मुलांना शरद पवारांच्या हस्ते आर्थिक मदत

बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. "झिपऱ्या"ची निर्मिती संस्था ए.आर.डी. प्रॉडक्शन्सच्यावतीने ही मदत देण्यात आली आहे.

बूट पॉलिश करणाऱ्या मुलांना शरद पवारांच्या हस्ते आर्थिक मदत
SHARES

बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. "झिपऱ्या"ची निर्मिती संस्था ए.आर.डी. प्रॉडक्शन्सच्यावतीने ही मदत देण्यात आली आहे. निमित्त होतं ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या आगामी मराठी चित्रपटाच्या स्पेशल शो चं...


राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, निर्मात्या अश्विनी रणजीत दरेकर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या संज्ञापन आणि वृतपत्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, दिग्दर्शक केदार वैद्य, अभिनेता सक्षम कुलकर्णी, चिन्मय कांबळी, प्रवीण तरडे आदी मान्यवर उपस्थित होते.


'या'मुलांना मदत...


यावेळी बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या विशाल किसन उतेकर आणि विकास किसन उतेकर या  दोघा भावांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


साधूंनी मुंबईचं शब्दांकन केलं...


साधू यांच्या साहित्याचा गौरव करताना शरद पवार म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील अचलपूरहून मुंबईत येऊन खऱ्या अर्थानं ते मुंबईकर झाले. मुंबई कुणालाही उपाशी ठेवत नाही. ती कायमच उत्साह देते. साधू यांनी मुंबईमध्ये जे अनुभवलं त्याचं उत्तम शब्दांकन करत दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आणि मराठी साहित्य समृद्ध केलं.

त्यांच्या सिंहासन चित्रपटावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांची केबिन, बंगला चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून राजकारण्यांची काहीशी टिंगल करण्यात आली होती, मात्र त्यातूनही काही चांगलं दिलं जाणार असेल तर त्याचाही आम्ही आनंद घेतो असंही पवार यांनी नमूद केलं.


फेलोशिपची घोषणा...


याप्रसंगी अरुण साधू स्मृती जतन समिती आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या संज्ञापन आणि वृतपत्र विभागाच्यावतीने साधू यांच्या स्मृतीदिनामित्त जाहीर करण्यात आलेल्या फेलोशिपची माहिती खासदार कुमार केतकर यांनी दिली.

सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण आणि वाचनाचे संस्कार बालपणातच झाले त्यामुळेच आज ‘झिपऱ्या’ सारख्या साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण करू शकल्याची भावना निर्मात्या अश्विनी रणजीत दरेकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केलं.


पवारांनी पाहिला ‘झिपऱ्या’

पवार यांनी सोमवारी सपत्निक ‘झिपऱ्या’ या सिनेमाचा आनंद लुटला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, यशवंतराव गडाख, माजी आमदार उल्हास पवार, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, हणमंतराव गायकवाड, आय. ए. एस. अधिकारी आनंदराव व्ही. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा