Advertisement

'अभिनेता सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करा'


'अभिनेता सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करा'
SHARES

वाल्मिकी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी वादात अडकले आहेत. आता या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी लेखी तक्रार अंधेरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.


दोघांनाही कारणे दाखवा नोटीस

मुंबईत एका टीव्ही शोमध्ये 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेता सलमान खानने जातीवाचक शब्द उच्चारला. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील एका टीव्ही कार्यक्रमात तसाच उच्चार केला होता. त्यांच्या या विधानामुळे भावाना दुखावल्या गेलेल्या वाल्मिकी समाजाने राजस्थान, गुजरात आणि हरियाणामध्ये आंदोलनं केली. त्यावेळी सलमान आणि शिल्पाच्या पुतळ्याचं दहन देखील केलं. या दोघांवर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या दोघांवर जयपूरमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा