Advertisement

'हे' दोन दिवस नेटफ्लिक्स मोफत पाहा

ज्यांनी अजूनही नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतलं नाही त्यांच्यासाठी ही मेजवानीच आहे.

'हे' दोन दिवस नेटफ्लिक्स मोफत पाहा
SHARES

लॉकडाऊनमध्ये लोकांचा एकमेव आसरा होता तो म्हणजे वेबसिरिज. वेबसिरिजसाठी लोकांची सर्वाधिक पसंती ही नेटफ्लिक्सलाच आहे. अजून देखील अनेक जण नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन करत आहेत. पण जर तुम्हाला सांगितलं की, दोन दिवस तुम्हाला नेटफ्लिक्स फुकटात पाहायला मिळालं तर?

आम्ही मसकरी करत नाही. हे खरं आहे. तुम्हाला चक्क दोन दिवस नेटफ्लिक्स फुकटात बघता येणार आहे. ४८ तासांसाठी फुकटात उपलब्ध असणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याचा विकेंड हा फ्री नेटफ्लिक्सचा असणार आहे. ज्यांनी अजूनही नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतलं नाही त्यांच्यासाठी ही मेजवानीच आहे.

४ डिसेंबरपासून दोन दिवस मोफत नेटफ्लिक्स वापरता येईल. नेटफ्लिक्सने स्ट्रीमफेस्ट अंतर्गत ही सोय उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा देण्यामागे त्यांचा हेतू असा आहे की, २ दिवस नेटफ्लिक्सवरील भन्नाट सिनेमे आणि सिरीज बघून लोकांनी पुढील काळात देखील नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यावे.

या स्ट्रीमफेस्टमुळे दोन दिवस नेटफ्लिक्सवर गर्दी असेल हे मात्र निश्चित. नेटफ्लिक्स दोन दिवस मोफत स्ट्रीमिंग उपलब्ध करून देत आहेच. त्यामुळे काय बघायचे याचे नियोजन आतापासून करून ठेवा.

नेटफ्लिक्सनं काही दिवसांपूर्वी त्यांचं ३० दिवसांचं फ्रि ट्रायल बंद केलं होतं. यापूर्वी प्रेक्षकांना एक महिन्याचं मोफत सबस्क्रिप्शन दिलं जायचं. एक महिला संपला की त्यानंतर प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवरील वेबसिरिज पाहण्यासाठी पैसे भरावे लागायचे. पण आता महिन्याचं मोफत सबस्क्रिप्शन बंद केलं आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा