'फुगे' ने बहरणार महाराष्ट्र !

 Mumbai
'फुगे' ने बहरणार महाराष्ट्र !
'फुगे' ने बहरणार महाराष्ट्र !
'फुगे' ने बहरणार महाराष्ट्र !
'फुगे' ने बहरणार महाराष्ट्र !
See all
Mumbai  -  

मुंबई - 'मनमौजी जगायचं, स्वच्छंदी उडायचं...' हे फुगे सिनेमाचे रिफ्रेश करणारे गाणे आजच्या तरुणाईला भुरळ पाडतंय. या फुग्यांचे खास आकर्षण असणाऱ्या युवकांना एकत्र आणणाऱ्या हटके कॅम्पेनची कीर्ती कॉलेजमध्ये सुरुवात झाली. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'फुगे' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी राबवलेल्या या हटके कॅम्पेनमधून संपूर्ण महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक फुग्यांचे वाटप केले जाणार आहे. प्रभादेवी येथील कीर्ती कॉलेजमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात 'फुगे' सिनेमाच्या म्युझिक टीममधील जान्हवी प्रभू अरोरा आणि निलेश मोहरीर यांनी उपस्थिती लावली होती.

एक सूर तर एक ताल असणाऱ्या या दोघांनी कॉलेज विद्यार्थांसोबत धम्माल मस्ती करत, फुग्यांचं वाटप केलं. तसंच सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरत आणि फुगे आकाशात उडवत सिनेमाच्या कॅम्पेनची शानदार सुरुवात देखील केली. मैत्रीच्या विश्वात रमणाऱ्या आणि बॅचलर लाइफ जगू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी 'फुगे' हा सिनेमा लवकरच मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन येत आहे.

Loading Comments