• दिवाळीचा 'जलसा'
  • दिवाळीचा 'जलसा'
SHARE

जुहू - अमिताभ बच्चन यांनी रविवारी त्यांच्या जलसा या बंगल्यावर दिवाळीनिमित्त मेजवानीचं आयोजन केलं होतं. या वेळी अभिषेक आणि एश्वर्यानं एकाच रंगाचा पेहराव केला होता. तर जया आणि अमिताभ बच्चन यांनी लाल रंगाचा पेहराव केला होता. या मेजवानीत रणबीर कपूर, कॅटरिना कैफ, संजय दत्त, कबिर खान, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, मिका सिंह, मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता, जॅकी आणि टायगर श्रॉफ, रणधीर आणि राजीव कपूर, सोनू सूद, श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, मलाइका अरोरा खान, अमृता अरोरा, अदिती राव हैदरी, राजकुमार संतोषी, बिपाशा बसू, करण सिंह ग्रोव्हर, आफताब शिवदासानी, भावना आणि चंकी पांडे, किरण खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर खेर, दिया मिर्झा, प्रसून जोशी, कोंकणा सेनशर्मा, जेपी दत्त, नेहा धुपिया, रेमो डिसुझा आणि सैफ अली खान अशी बॉलिवूड ताऱ्यांची मांदियाळीच अवतरली होती. या मेजवानीबद्दल करण सिंह ग्रोव्हरनं ट्विट करून अमिताभ यांचे आभार मानले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या