Advertisement

'गोलमाल अगेन'च्या शूटिंगला सुरुवात


'गोलमाल अगेन'च्या शूटिंगला सुरुवात
SHARES

मुंबई - विनोदी चित्रपटांच्या रांगेतील गोलमाल या चित्रपटाच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल 3’ या धमाल विनोदी चित्रपटांनंतर आता या सिरिजमधील आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या विनोदी चित्रपटांच्या सिरिजमधील ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला गुरुवारपासून सुरुवात झाली.

अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाच्या मुहूर्ताचा एक फोटो पोस्ट केलाय. परिणीतीने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ‘गोलमाल अगेन’च्या क्लॅपबोर्डसोबतच या सिरिजमधील याआधीच्या सर्व चित्रपटांचे क्लॅपबोर्डही पाहायला मिळतात. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असून, चित्रपटाचे चित्रिकरण हैद्राबाद आणि उटी येथे करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement