Advertisement

घाडगे & सूनमध्ये रंगणार 'गोंधळ'


घाडगे & सूनमध्ये रंगणार 'गोंधळ'
SHARES

कलर्स मराठीवर लोकप्रिय ठरलेल्या घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भक्तीमय वातावरण आहे. मालिकेतील सगळेच कलाकार खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत दाखल झाले अाहेत. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतला. नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने सर्व विधी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण घाडगे कुटुंब जेजुरीला गेले खरं पण, या विधी अमृताबरोबर पूर्ण करणे अक्षयला खूपच कठीण जात आहे. आता खंडोबाच्या दर्शनासह अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळ विधीही पार पडणार आहे. हा विधी निर्विघ्नपणे पार पडेल? अमृताच्या समोर आणखी कोणते सत्य येणार आहे? ते सत्य कळल्यावर माईना हे सत्य अमृता सांगू शकेल? हे सगळे प्रेक्षकांना जाणून घेण्यसाठी घाडगे & सूनचे येणारे भाग बघावे लागणार आहेत.



घाडगे घराण्याच्या खजिन्याचे रहस्य

खंडेरायाच्या दर्शनानंतर घरामध्ये जागरण-गोंधळ घालावा लागतो, अशी घाडगे घराण्याची प्रथा अाहे. या जागरणानिमित्त माई सर्वांना वाड्याच्या खालच्या खोलीमध्ये खजिना दडलेला अाहे, हे गुपित सांगतात. मात्र घाडगे घराण्याचा खजिना ज्याने कोणी मिळविण्याचा प्रयत्न केला, त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे अमृताच्या विरोधात असलेली वसुधा नवी खेळी खेळणार आहे, ज्याबद्दल माई आणि संपूर्ण घाडगे परिवार अनभिज्ञ आहे. अमृताला वसुधाच्या या खेळीबद्दल कळेल का? घाडगे घरात घडणारा हा गोंधळात गोंधळ अमृता माईच्या मदतीने कसा दूर करेल, हे बघणे रंजक असणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा