'जॉली एलएलबी - 2'ला मुहूर्त मिळाला

 Mumbai
'जॉली एलएलबी - 2'ला मुहूर्त मिळाला
Mumbai  -  

मुंबई - खिलाडी अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच जॉली एल एल बी -2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण न्यायालयाने आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार 10 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात झळकणार आहे.

या सिनेमात काही आक्षेपार्ह डायलॉग आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता या सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य आणि संवादांवर कात्री लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Loading Comments