• गुणनिधी नाट्यसंगीत स्पर्धेचा समारोप
  • गुणनिधी नाट्यसंगीत स्पर्धेचा समारोप
SHARE

दादर- स्वा.सावरकर स्मारकाच्या विशेष सहयोगाने कलांगण आयोजित नाट्यसंगीत स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी पार पडली. यावेळी पं. चंद्रकांत लिमये, अर्चना कान्हेरे, त्यागराज खाडिलकर, राजेंद्र भावे आणि निलाक्षी पेंढारकर या नाट्यसंगीतातील मान्यवरांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या अंतिम स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी सवेष अभिनय नाटकातील संवादासह आपले पद सादर केले. यावेळी स्पर्धकांना ऑर्गनवर ज्येष्ठ वादक मकरंद कुंडले यांनी साथ दिली. संगीतकार वर्षा भावे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा नमन नटवरा या नाट्यमय सुत्रातून सादर झाली. या कार्यक्रमाला स्वरकिर्ती किर्ती शिलेदार यांची उपस्थिती होती.

पं. नीलकंठ अभ्यंकर गुणनिधी गौरव मानचिन्ह आणि प्रथम बक्षिस बेळगावच्या अनुष्का आपटेने पटकावले. तर श्रोत्यांच्या बक्षिसाची मानकरी सोजी मेथ्यू ठरली. युवा गटात प्रथम इंदिराबाई खाडिलकर पुरस्कार रु. 5000 आणि कृ.प्र.खाडीलकर ट्रॉफी पुण्याच्या श्रुती मेंहेंदळे हिला मिळाली. दुस-या क्रमांकाचा गोविंद देवल पुरस्कार रु 3000 आणि ट्रॉफी नचिकेत लेले याला, तर तृतीय क्रमांकाचा मास्टर लेले पुरस्कार रु. 2000 कल्याणी पवार हिला मिळाला. अशा प्रकारे गुणनिधी नाटयसंगीत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या