Advertisement

अथर्वच्या मुंजीत गुरूची 'उत्तरपूजा'


अथर्वच्या मुंजीत गुरूची 'उत्तरपूजा'
SHARES

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेनं रसिकप्रेक्षकांवर छाप पाडली असून दरवेळी येणाऱ्या ट्विस्टमुळे मालिकेतील उत्कंठता वाढत चालली अाहे. सध्या मालिका एका रोमांचक वळणावर अाली असून अथर्वच्या मुंजीसाठी राधिका, गुरुनाथ नागपूर गाठणार अाहेत. मात्र शनायाला न सांगताच प्राॅपर्टीसाठी अाणि अथर्वसाठी गुरुनाथही नागपूरला रवाना झाला अाहे. केवळ सोपस्कार म्हणून गुरुनाथनं या मुंजीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली असली तरी नागपूरात मात्र गुरुनाथची भंबेरी उडणार अाहे.


शनायाला बघून गुरुनाथची दाणादाण

गुरुनाथनं शनायाप्रकरण अापल्या अाई-वडिलांपासून लपवून ठेवले अाहे. पण अथर्वच्या मुंजीत अचानकपणे शनाया हजर राहणार अाहे. शनायाला पाहून गुरुनाथची चांगलीच दाणादाण उडणार अाहे. त्यामुळे शनायाच्या येण्याने अथर्वच्या मुंजीत गुरुनाथचीच उत्तरपूजा घातली जाणार अाहे.


अाई-बाबांनाही कळणार शनाया-गुरुचं प्रेमप्रकरण

यावेळी मात्र अाई-बाबांनाही गुरु अाणि शनायामधलं प्रेमप्रकरण कळणार अाहे. त्यामुळे गुरूचे बाबा आता प्रॉपर्टीबद्दल काय निर्णय घेतील? ते गुरूला प्रॉपर्टीतून बेदखल करतील का? अथर्वच्या मुंजीत शनाया काय गोंधळ घालेल? राधिका नेहमीप्रमाणे शनायाला धडा शिकवणार का? राधिका आता काय पाऊल उचलणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची असतील तर मालिकेचे पुढील काही भाग नक्की चुकवू नका...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा