Advertisement

बिग बॉसच्या आधी हर्षदाची 'या' ठिकाणी एन्ट्री


बिग बॉसच्या आधी हर्षदाची 'या' ठिकाणी एन्ट्री
SHARES

टेलिव्हिजन विश्वात आक्कासाहेब बनून अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकरची नुकतीच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्डने एन्ट्री झाली. हर्षदाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच तीची धमाकेदार एन्ट्री बिग बॉसच्या घरात झाली.
मराठी टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीत हर्षदा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आणि बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच आपल्या रोखठोक सवाल-जवाबाने पुन्हा एकदा हर्षदा खानविलकरने रसिकांची मनं जिंकली.


बिग बॉसच्या आधी इन्स्टाग्रामवर एन्ट्री

बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधी सकाळी हर्षदा खानविलकरने इन्स्टाग्रामवर एन्ट्री घेतली. इन्स्टाग्रामवर येताच 24 तासाच्या आत हर्षदाच्या फॉलोवर्सची संख्या तीन हजारांच्यावर गेली. सुत्रांच्या अनुसार, हर्षदा खानविलकर ही पहिली मराठी अभिनेत्री आहे, जिचे 24 तासात एवढे जास्त फॉलोवर्स झाले. हर्षदाची जनमानसात असलेली ही प्रसिद्धी माहीत असल्यामुळेच इन्डमॉल शाइनने त्यांची बिग बॉसमध्ये एन्ट्री करायचं ठरवलं.



इंडमॉलचीही स्ट्रॅटेजी आली कामी

बिग बॉसच्या घरात काही दिवसांपासून चालू असलेल्या त्याच-त्याच वादाचा परिणाम बिग बॉसच्या घसरत्या टीआरपीवरही होत होता. त्यामुळेच आक्कासाहेब बनून सहा वर्ष मालिकेचा टीआरपी चढता ठेवण्याएवढी लोकप्रियता मिळवणाऱ्या हर्षदा खानविलकरची एन्ट्री बिगबॉसमध्ये झाली. आणि हर्षदाच्या इन्स्टा अकाऊंटवर प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे इंडमॉलचीही स्ट्रॅटेजी कामी आल्याची गोष्ट अधोरेखित होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा