नावातच आहे सारं काही!

 Mumbai
नावातच आहे सारं काही!

मुंबई - हृतिक रोशनचा काबिल सिनेमा चांगलाच गाजला. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचेही कौतुक झाले. चित्रपटात हृतिकने रोहन भटनागर ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याने सााकारलेल्या या व्यक्तीरेखेचे कौतुक करण्यासाठी चक्क हृतिकला त्याच्या चाहत्याने पत्र लिहले आहे. या चाहत्याचे नाव आहे रोहन भटनागर. काबिल या सिनेमात हृतिकने साकारलेल्या व्यक्तीरेखेचे नावही रोहन भटनागर होते. चित्रपटात रोहन भटनागर हे नाव वापरल्याबद्दल रोहनने हृतिकचे पत्राद्वारे आभार मानले आहेत. हृतिकमुळे माझ्या नावाला प्रसिद्धी मिळाली, असे रोहनने पत्रात म्हटले आहे.

तर खुद्द हृतिक रोशनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मी रोहन भटनागर या व्यक्तीरेखेचे महत्त्व समजलो. मला आनंद आहे की माझी ही व्यक्तीरेखा रोहनला पसंत पडली आणि त्याने त्याचे कौतुक केले. एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे," असे हृतिकने म्हटले आहे.

Loading Comments