हृतिक रोशन झळकणार मराठी सिनेमात

  Mumbai
  हृतिक रोशन झळकणार मराठी सिनेमात
  मुंबई  -  

  गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ' हृदयांतर' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. या सिनेमात हृतिक रोशन पहिल्यांदा मराठी सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम करणार आहे तर  सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

  समायरा जोशी (मुक्ता )आणि शेखर जोशी (सुबोध )नवरा बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. हे दोघे आणि ह्यांच्या २ मुली नित्या आणि नायशा . ह्या कुटुंबाची कथा 'हृदयांतर' पहायला मिळणार आहे. लागणीच्या काही वर्षानंतर ह्या दोघांच्या नेतात असे काही चढउतार येतात की समायरा घटस्फोट निर्णय घेते. पण त्यानंतर त्यांना समजत की त्यांच्या १० वर्षाच्या मुलीला कर्करोग झाला आहे. आणि ह्या गोष्टीनंतर त्यांच आयुष्य बदलून जातं. पुढे त्यांच्या आयुष्यात काय होतं, हे हृदयांतरमध्ये दाखवण्यात आलंय. या ट्रेलर मध्ये हृतिक रोशनची झलक पाहायला मिळते.

  ट्रेलरनंतर ह्या सिनेमाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. विक्रम फडणीस ‘हृदयांतर’ सिनेमा याआधी ९ जूनला प्रदर्शित होणार होता. पण, आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ७ जुलै करण्यात आली आहे.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.