• 'या' आलिशान घरात थाटणार विरुष्का आपला संसार
  • 'या' आलिशान घरात थाटणार विरुष्का आपला संसार
SHARE

सोशल मीडियावर सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्याच चर्चा रंगल्या आहेत. अगदी दोघांच्या लग्नापासून ते त्यांच्या कपड्यांपर्यंत सर्वांच्या ओठी फक्त याच चर्चा. आता या चर्चांमध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे विरुष्का लग्नानंतर दिल्लीत राहणार की मुंबईत? पण आता त्याचंही उत्तरही जवळपास सर्वांना मिळालं आहे.विरुष्का या जोडीनं लग्नानंतर मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये विराट आणि अनुष्का या दोघांनी मुंबईतील प्रतिष्ठीत परिसरात एक आलिशान घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हीही चकित व्हाल. जवळपास 34 कोटींच्या घरात विरुष्का आपला संसार थाटणार आहेत.

'ओमकार रिलेटर्स अँड डेव्हलपर्स रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट' अंतर्गत वरळी इथं साकारण्यात आलेल्या ओमकार 1973 दोघांचा आशियाना असेल. 5 बीएचके आणि सी फेसिंग व्ह्यू असणाऱ्या 7, 171 चौरस फुटांच्या घरात ते राहतील. ओमकार रिलेटर्सच्या या प्रोजेक्टमध्ये इनडोअर टेनिस कोर्ट, पेट क्लिनीक आणि लहान मुलांसाठी डे केअर सेंटरही असणार आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.फक्त विराट कोहलीच नाही तर या इमारतीत 2013 मध्ये युवराज सिंगनं देखील घर घेतलं होतं. पण विराटनं रेफ्यूज टॉवर बुक केला आहे. लवकरच विराट मुंबईत येणार आहे. त्याआधी 21 डिसेंबरला दिल्लीत विराट जंगी पार्टी देणार आहे. त्यानंतर 26 डिसेंबरला मुंबईत बॉलिवूड आणि क्रीडा विश्वातील खास पाहुण्यांसाठी खास पार्टीचं आयोजन केलं आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या