कोणाला घाबरला दबंग खान ?

  Mumbai
  कोणाला घाबरला दबंग खान ?
  मुंबई  -  

  मुंबई - बॉलीवूडचा दबंग खान सध्या खूपच घाबरला आहे. त्याच्या या भितीचे कारण आहे बाहुबली 2 हा चित्रपट. या भितीपोटी सलमान खानने त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनही पुढे ढकलले आहे. त्याचे कारण म्हणजे बाहुबली 2 एप्रिलमध्ये तर सलमानचा आगामी चित्रपट ट्यूबलाइट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. जर बाहुबली 2 प्रदर्शित व्हायच्या आधी ट्यूबलाइटचे प्रमोशन केले तर त्याकडे दुर्लक्ष केले जाईल. म्हणून सलमानने त्याच्या पीआर कंपनीला ट्यूबलाइटचे प्रमोशन बाहुबली प्रदर्शित झाल्यानंतर करण्याचे आदेश दिले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.