हिमेशचा नवा अल्बम रिलीज

    मुंबई  -  

    जूहू - हिमेश रेशमिया यांच्या नव्या आप से मौसकी या अल्बमचा शुभारंभ अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आला. सोमवारी जुहू पीव्हीआर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी हिमेश रेशमिया, पूजा बॅनर्जी, अलंकीका सहाय अनेक कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. आपल्या कामातून वेळ काढून अमिताभ बच्चन या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाल्याचं हिमेशने सांगितलं आणि अमिताभ बच्चन यांचं भरभरुन कौतुक केलं. तर अमिताभ यांनी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा अल्बम पूर्णपणे लव्ह साँगवर आधारीत आहे. नवीन पिढीचा विचार करून हा अल्बम बनवण्यात आला असल्याचं त्याने सांगितलं.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.