Advertisement

रणबीर-कतरिनामध्ये अनबन कायम


रणबीर-कतरिनामध्ये अनबन कायम
SHARES

मुंबई - अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपट जग्गा जासूस 7 एप्रिल 2017 ला सिनेमागृहात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यांच्यासोबतच गोविंदा, सायानी गुप्ता आणि अदा शर्मा देखील या चित्रपटात दिसतील. या चित्रपटाची कहाणी गुप्तहेर असलेल्या एका तरुणावर आधारित आहे. जो आपल्या हरवलेल्या वडिलांच्या शोधात आहे. यापूर्वी कतरिना आणि रणबीर ही जोडी राजनीती आणि अजब प्रेम की गजब कहानीमध्ये दिसली होती.
रणबीर आणि कतरिना एकत्रित चित्रपटाचं प्रमोशन करणार नसल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. हा चित्रपट एक वर्षानंतर प्रदर्शित होणार आहे. त्यातच चित्रपटाच्या प्रमोशन बद्दलच्या अशा प्रकारच्या वृत्तामुळे अनुराग बसुंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जातं की, कतरिना कैफ आणि रणबीर कपूर ब्रेकअपच्या धक्क्यापासून अजूनही सावरलेले नाहीत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा