Advertisement

'जर्नी प्रेमाची' चित्रपटाचा ट्रेलर लाँच


'जर्नी प्रेमाची' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
SHARES

दादर - प्लाझा थिएटरमध्ये पार्थ प्रोडक्शन निर्मीत जर्नी प्रेमाची या चित्रपटाचा म्युझिक लाँच आणि ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि संवाद लेखन अमोल भावे यांनी केलय.

अमेरिकेत असणाऱ्या आदित्यला भारतात असणाऱ्या आपल्या बालमैत्रीणीशी लग्न करायचं असतं. आपल्या बालमैत्रीणीला शोधण्यासाठी आदित्य भारतात येतो. केवळ अम्मो यानावरून आपल्या बाल मैत्रीणीला शोधायला कोल्हापूरला येतो. या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता आदित्यला त्याचं प्रेम मिळतं का ? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना 17 फेब्रुवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. 17 फेब्रूवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा