Advertisement

कोर्टानं बजावले कंगना विरोधात समन्स

जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणावर कंगना रणौतनं प्रतिक्रिया दिली आहे.

कोर्टानं बजावले कंगना विरोधात समन्स
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतच्या आडचणीत आणखीन वाढ झाली आहे. कंगना विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयानं कंगनाला समन्स बजावलं आहे. १ मार्चला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

कंगनानं बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप केला होता, तसंच कंगनानं अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख रिपब्लिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

याप्रकरणी कंगना विरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. याची दखल घेत न्यायालयानं कंगनाला समन्स बजावलं. आता या प्रकरणाची सुनावणी १ मार्चपर्यंत तहकूब केली.

जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणावर कंगना रणौतनं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं ट्विट केलं की, "गीदड़ों का एक झुंड और एक शेरनी... मजा आएगा। कंगना रणौतनं या पोस्टमधील कोणाचेही नाव घेतलेलं नाही, परंतु तिने स्पष्टपणे आपल्या विरोधकांची सत्तेशी तुलना केली आणि स्वत:ला शेरनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंधेरी मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी यांनी जुहू पोलिसांना जावेद अख्तर यांच्या वतीनं दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

सोमवारी पोलिसांनी आपला अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात पोलिसांनी सांगितलं की, जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर पुढील तपास होणं आवश्यक आहे. दंडाधिकारी आर.आर. खानच्या कोर्टानं कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे.

गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या तक्रारीत कंगना रणौतनं त्यांच्याविरोधात निराधार भाष्य केलं आणि त्याला दरबारी म्हटल्याचा आरोप केला आहे. जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे की, सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर कंगना रणौतनं केलेल्या टिप्पणीमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा