कपिल मागे ट्विटची साडेसाती


SHARE

वर्सोवा - कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणी काही कमी होत नाहियेत. कपिल विरोधात आता वर्सोवा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. कपिलच्या वर्सोव्यातल्या घरामागे तिवरांच्या झाडाची कत्तल करून डेब्रिज टाकण्यात आले होते. याविरोधात पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.

सात नोव्हेंबर २०१५ मध्ये कपिल शर्माने चार बंगलो, म्हाडा कॉलनीतील बंगला क्रमांक ७१ विकत घेतला होता. या बंगल्यात करण्यात आलेल्या अवैध बदलांविरोधात पालिकेने तोडक कारवाई केली होती. पालिकेच्या या कारवाईविरोधात कपिलने ट्विटर वर आवाज उठवला होता. त्यानंतर मोठा गदारोळ झाला आणि त्याची मोठी किंमत कपिलला मोजावी लागली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या