कपिल शर्मा विरोधात गुन्हा दाखल

मुंबई - विनाेदी अभिनेता कपिल शर्माने तिवरांची कत्तल करून वर्सोव्यातील त्याच्या कार्यालयाचं वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बुधवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सामाजिक कार्यकर्ते संतोष दांडेकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर दांडेकर यांची फिर्याद नोंदवून घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला. दांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एमआरटीपी कायदा कलम 52, महाराष्ट्र पर्यावरण कायदा कलम 15 तसेच भादवी 187 अंतर्गत हा गुन्हा दाखल केल्याचं वकील आभा सिंह यांनी सांगितलं.

Loading Comments