Advertisement

इप्टामध्ये 'खर-खर'


इप्टामध्ये 'खर-खर'
SHARES

माटुंगा - इप्टाच्या प्राथमिक फेरीतील दुसऱ्या दिवशी अनेक एकांकिकांनी रंगत आणली होती. त्यात खास ठरली ती विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाची 'खर-खर' ही एकांकीका. अमात्य गोराडिया लिखित आणि दिग्दर्शित या एकांकिकेत स्वातंत्र्य किती मेहनतीने मिळाले आहे हे पटवताना उषा मेहता यांचा संदर्भ देण्यात आला होता. उषा मेहता यांनी कशाप्रकारे रेडिओमार्फत जनजागृती केली, त्यांना कोणत्या हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या याचं मार्मिक चित्रण या एकांकिकेत करण्यात आलं. नेपथ्य आणि संगीतात देखील हा संघ सध्या वरचढ ठरत आहे.

संबंधित विषय
Advertisement