Advertisement

'कुंग फू योगा' लुटूपुटूचा थरार...


'कुंग फू योगा' लुटूपुटूचा थरार...
SHARES

मुंबई - जॅकी चॅनचा चित्रपट म्हटला की स्टंट्स आणि थराराची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. गेल्या अनेक वर्षांपासून जॅकीनं हा जॉनर आपल्या कर्तृत्वामुळे मोठा केला आहे. मात्र अनेकदा मोठेपणा बडेजाव मिरवण्याच्या नादात सगळी गडबड होते. अशीच काहीशी गडबड कुंग फू योगा चित्रपटात झाली आहे. दोन-चार साहसी स्टंटस, तेवढेच विनोद आणि व्हिज्युअली ट्रीट ठरणारी काही दृश्यं सोडल्यास कुंग फू योगा म्हणजे नुसता लुटूपुटूचा थरार ठरतो. कोणत्याही कलाकृतीला कथानकाचा भक्कम पाया नसेल तर ती कलाकृती नुसती पत्त्याच्या बंगल्यासारखी तकलादू भासते, याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना सतत येतो.

चीनमधील एका म्युझिअममध्ये जॅक (जॅकी चॅन) हा पुरातत्त्वतज्ज्ञ कार्यरत असतो. एके दिवशी त्याला भारतामधून अश्मिता (दिशा पटनी) आणि तिची सहकारी कायरा (अमायरा दस्तूर) भेटायला येते. अश्मिताकडे एक हजार वर्षांपूर्वीचा भारतामधील मगधनगरीचा नकाशा असतो. या नकाशानुसार सुवर्णखजिना तिथं दडलेला असतो. या खजिन्याची शोधमोहिम जॅकनी सुरू करावी, अशी विनंती अश्मिता करते. या विनंतीचा मान ठेवून जॅक आणि त्याचे इतर काही सहकारी या शोधमोहिमेवर निघतात. ही शोधमोहिम तिबेट ते राजस्थान व्हाया दुबई अशी होते. या मोहिमेत जॅकला मोठा अडथळा ठरतो तो रॅंडल (सोनू सूद). त्याला या नकाशाची आणि संभाव्य खजिन्याची माहिती मिळते. हा खजिना सरकारचा नसून आपला असल्याचा दावा करत तो जॅकच्या जीवावर उठतो. शेवटी या मोहिमेत बाजी कोण मारतो, हे पडद्यावर पाहिलेलं बरं.

स्टॅनली टॉग यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. वास्तविक गेल्या चार दशकांपासून दिग्दर्शनात कार्यरत असलेला हा अनुभवी दिग्दर्शक आहे. परंतु, स्टंट्स, विनोद, थरार, नाट्य अशा सर्व रसांची सरमिसळ करण्यात टॉग यांच्यातला लेखक कमी पडला आहे. त्यामुळेच जॅकी चॅनसारखा पडद्यापेक्षा मोठा असलेला नट आणि मोठा कॅनव्हास हाती असूनही या चित्रपटामधून पाहणाऱ्याच्या हाती फारसं काही लागत नाही. मगधमधील लपलेल्या सुवर्णनगरीचा शोध, ही या चित्रपटाची वनलाईन आहे. खरं तर एका चांगल्या चित्रपटासाठी एवढी एकच ओळ पुरेशी होती. परंतु, टॉग यांच्या पटकथेनं सगळी गडबड केली आहे. त्यामुळेच 102 मिनिटांची लांबी असलेला हा चित्रपट खूप मोठा भासतो. मगध नगरीच्या शोधासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण घटनाक्रम अपेक्षित होता. परंतु, दिग्दर्शकानं जॅकी चॅन यांची इमेज लक्षात घेऊन त्यापद्धतीनं सर्व दृश्यं प्लॅन केली आहेत. दुबईमधील हिरेविक्रीचा घटनाक्रम अगदीच फुसका वाटतो.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा